

उत्तरप्रदेश : भीषण अपघातात 7 ठार, 40 जखमी
Uttar Pradesh 7 died 40 injured in Accident – लखनऊ, 04 ऑगस्ट: उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर, उसराहर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्याच्या पलीकडे गेली आणि रायबरेलीहून येणाऱ्या स्लीपर बसला धडकली. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या 20 फूट खाली खड्ड्यात पडून 7 जण ठार तर 40 जखमी झाले. पोलीस दलाने मानवी साखळी करून जखमींना बाहेर काढले. (Agra Lucknow Expressway Accident )
नागालँड क्रमांकाची स्लीपर बस 60 प्रवासी घेऊन रायबरेलीहून दिल्लीला जात होती, तर दुसरीकडे आग्राहून लखनऊला जाणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. अनियंत्रित कार दुभाजक ओलांडून या रस्त्यावर आली. अचानक समोरून आलेल्या कारला वाचवण्यासाठी बसचालक साईडला गेला, मात्र कारला धडक बसल्याने दोन्ही वाहने जोराचा आवाज करत रस्त्याच्या कडेला सुमारे 20 फूट खाली खड्ड्यात पडली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. माहिती मिळताच एसएसपी संजय वर्मा, एएसपी सत्यपाल सिंह, एसडीएम सदर राघव विक्रम, सीओ सैफई शैलेंद्र प्रताप गौतम आणि जवळपासच्या पोलीस ठाण्यांतील अनेक अधिकारी आणि दल घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मानवी साखळी तयार करून जखमींना बाहेर आढले आणि सैफई येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. या अपघातात कार आणि बसमधून प्रवास करणाऱ्या 7 जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित 40 जण जखमी झालेत. यापैकी अनेक जण लखनऊ, रायबरेली आणि अमेठीतील रहिवासी आहेत. तर अपघातग्रस्त कार कन्नौजच्या गद्दाईया उसर गावातील आहे.
दरम्यान अपघातातील किरकोळ जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांची इतर वाहनाने व्यवस्था करण्यात आली.