शहरी नक्षलवाद्यांची शैक्षणिक क्षेत्रातील घुसखोरी 

0

आज जगभरातील भारतीय नागरिकांना आपल्या अस्तित्वाबद्दल कौतुक वाटत असल्याचे बघायला मिळते. याचे सर्वात मोठे कारण असे की, गेल्या काही काळात जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणीच्या उदयामुळे उघड झालेला डाव्या विचारवंतांचा फसवा चेहरा.

हा फसवा चेहरा समोर आल्यामुळे अर्थात अजून एक गोष्ट उघड झाली जी म्हणजे डाव्यांचे मैदान; भारतीय शिक्षण क्षेत्र आणि काही नामांकित शिक्षण संस्था. सहसा असे देखील पाहायला मिळाले आहे की एकट्या प्राध्यापकामुळे एखाद्या संस्थेचे एखादे विभाग किंवा काही ठिकाणी पूर्ण संस्थाच एका विशिष्ट विचारसरणीची गुलाम बनली आहे. याचे पडसाद भारतासारख्या वैविध्यपूर्ण लोकशाहीकरीता किती गंभीर असू शकतात ते आपण येथे पाहूया;

वर्षानुवर्षांपासून हा शहरी ‘नक्षलवाद’ व ‘माओवाद’ आपल्यामध्ये एक ‘Elitist’ मुखवटा घेऊन सोयीस्करपणे वावरत आहे. ज्यामुळे त्याला ओळखणे अवघड होते. अर्थात, इतका काळ सर्वत्र डाव्या विचारसरणीचे वर्चस्व असल्यामुळे हा ‘शहरी नक्षलवाद’ सर्व व्यवस्थेत खोलवर रुजला आहे.

२०२० मध्ये प्रकाशित झालेले ‘नवीन शैक्षणिक धोरण’ सध्या क्रमाक्रमाने अमलात आणले जात असले तरी त्याचे होणारे फायदे हे भविष्यासाठी असतील. पण भारताच्या आजच्या सामाजिक, सांस्कृतीक व तात्त्विक मुद्यांचे उत्तर जर आपल्याला हवे असेल तर त्यासाठी आजच्या तरुणांचा व त्या आधीच्या पिढ्यांचा अभ्यासक्रम व शैक्षणिक वातावरण समजून घेणे आवश्यक आहे.

सा विद्या या विमुक्तये। (ज्ञान तेच आहे जे स्वातंत्र्य देते) कोणत्याही समाजाचा आरसा हा तेथील शिक्षण व्यवस्थेत दडलेला असतो. तेथील समाज जे शिकतो, जे वाचतो तेच तो आचरणात आणतो. आजपर्यंतची भारताची अडचण हीच होती. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या शिक्षकांचे व प्राध्यापकांचे एवढेच योगदान आहे की त्यांनी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना हे पटवून दिले की ‘भारत हा अनुयायांचा (followers) देश आहे’. याचा परिणाम हा झाला की त्यांनी भारतासारख्या गौरवशाली भौतिक शक्तीला पाश्चिमात्य मानसिकतेच्या चौकटीत अडकवून ठेवले.

आजच्या तरुण पिढीने अभ्यासलेला अभ्यासक्रम हा डाव्या विचारसरणीने कलुषित केलेला होता किंवा अजूनही आहे. या गोष्टींचा परिणाम इतका गंभीर झाला आहे की आपण आपल्या स्वतःच्याच संस्कृतीचा, इतिहासाचा, भारतीय विचारांचा विस्मरण करून ‘पाश्चात्य संस्कृतीचे’ आधिपत्य अगदी सहज स्वीकारले आहे.

भारताची परंपराही सर्व विचारांचे स्वागत करणारी असली तरी यात स्वतःच्या अस्तित्वाचे व मुळ भारतीय विचारांचे विस्मरण व्हावे असा अर्थ नक्कीच नाही. माओवाद्यांनी कायम भारताच्या अस्तित्वावर घाला घातला व यासाठी त्यांनी निवडलेला सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे ‘ शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारतीयांना “स्व:”चे विस्मरण करायला भाग पाडणे’.

वरती नमूद केलेल्या बातम्या वाचल्या की आपल्याला लक्षात येते की भारताची तरुणाई जी खरी तर या देशाची सर्वात मोठी शक्ति आहे, त्यांना सतत ‘students’ movement’ च्या नावाखाली पद्धतशीरपणे समाजात अशांतता पसरवण्यासाठी वापरले जाते. यामध्ये महाराष्ट्रात बघायला गेले तर प्रामुख्याने IIT Bombay, FTII (Film & Television Institute of India) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या संस्थांचे नाव सातत्याने आढळते.

यातील अधिक महत्वाची अंतरदृष्टि अशी की IIT Bombay जे डाव्यांच्या उचापतींसाठी वारंवार बातम्यांमध्ये झळकत असते त्याचा नुकत्यात केलेल्या अभ्यासानुसार या शैक्षणिक वर्षात केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘placement’ करू शकले आहे. त्यामुळे तरुणांना अशा प्रकारच्या विघटक movements मध्ये खेळवत ठेवून मुळात त्यांच्या पदरात काय पडत आहे यावर विचार झाला पाहिजे.