‘शिवप्रभु झाले छत्रपती’ चे लोकार्पण

0

 

नागपूर (Nagpur):- अनिल शेंडे यांच्या ‘शिवप्रभु झाले छत्रपती’ चे लोकार्पण २६ जुलै रोजी
धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज ह्यांच्या शुभ हस्ते लोकार्पणसुप्रसिद्ध कवी अनिल शेंडे रचित छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित “शिवप्रभु झाले छत्रपती” या शिवगौरव गीताचा ध्वनिचित्रफीत लोकार्पण सोहळा शनिवार, २६ जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

श्री गुरुमंदिर, 80, जयप्रकाश नगर येथे धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते ध्वनिचित्रफीतचे लोकार्पण होईल. मुंबईचे संगीतकार माधव भागवत मुंबई ह्यांनी या गीताला संगीत दिले असून गीताचे गायक गौरव चाटे आहेत. संगीत संयोजन प्रकाश लळीत यांचे आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.