गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

0

 

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार 28 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या भात पिकावर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकाची मळणी सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे या आठ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले आहे. दोन तालुक्यात भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. 28 नोव्हेंबर रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यामध्ये 2 हजार 775 हेक्टर भात पिकाचे क्षेत्र प्रभावीत झाले आहे. तर दोन तालुक्यात भाजीपाला पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. याविषयीचा अहवाल विभागीय स्तरावर पाठवण्यात आला असून आता या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची भरपाई आणि पीक विमा योजनेचा लाभ मिळावा याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या तालुका कृषी केंद्रावर जाऊन आपल्या शेत पिकाची नुकसान झाल्याची नोंद करावी असे आवाहन कृषी अधिकारी
हिंदुराव चौहान यांनी केले आहे.