
मुंबई : उद्धव ठाकरे हे भाजपशी युती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकांना हजेरी लावत आहेत तर दुसरीकडे ते भाजपसोबत युतीचे प्रयत्न करीत आहेत. आपले भाजपसोबत युती करण्याचे प्रयत्न सुरु नाहीत, हे त्यांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, असे आवाहन राणे यांनी दिले आहे. (Nitesh Rane On Uddhav Thackeray)
कणकवलीमध्ये बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला की, काल चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची हमी चालते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही ईव्हीएमची कमाल असल्याचा दावा संजय राऊत करीत आहेत. तेलंगणामध्येही ईव्हीएमची कमाल आहे का? असा सवाल त्यांनी केला. महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली असे महिलांबाबात संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान झाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.