

मुंबई Mumbai: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केल्यावर आता फडणवीस यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे. “माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे”, या शब्दात त्यांनी ठाकरेंवर तिखट शब्दात टीका केली.
“या मानसिक स्थितीतून ते बोलत असतील, तर त्याच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे”, असेही फडणवीस म्हणाले.After Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis as a disgrace to Nagpur, now Fadnavis has also hit back at him. “My former friend Uddhav Thackeray’s mental condition is not good. He needs a psychiatrist. We should understand his condition”, he criticized Thackeray in sharp words.
“If he is speaking from this state of mind, it will not be appropriate to talk about him. Everyone should understand his condition,” Fadnavis said.
फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातूनही उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.
फडणवीस यांनी नमूद केलं की, “ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!,
सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!,
सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!,
ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!,
पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का? असे विचारणे, याला म्हणतात कलंक!,
कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!,
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!, असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!” असा खोचक सल्लाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.