उबाठा गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या

0

 

(Amaravti)अमरावती – पीक विम्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पीक विमा कंपनीचे अधिकारी विमा देण्यासाठी पैसे मागत असल्याचा यानिमित्ताने धक्कादायक खुलासा केला असून जिल्हा कृषी अधिकारी यांना ऑडियो क्लिप त्यांनी ऐकवली आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा न मिळाल्याने अमरावती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चांगलीच बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी पीक विमा अधिकाऱ्यांवर अंगावर खुर्ची उगारल्याने मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे.

दरम्यान सर्वेक्षण करतांना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला व ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही, त्यांना पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप उबाठा गटाने केला आहे. जोपर्यंत पीक विमा कर्मच्याऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करमार असल्याचा इशारा उबाठा गटाने व शेतकऱ्यांनी दिला.