

भंडारा(Bhandara), १८ जून :- आई – वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने मजूर म्हणून शेतीच्या कामावर आलेल्या दोन युवकांनी 25 वर्षीय मतिमंद तरूणीवर मोका पाहून अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. हा सर्व प्रकार मतिमंद तरूणीच्या बहिणीच्या लक्षात येताच तात्काळ पोलिस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ तपस चक्र फिरवत अत्याचार करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सविंद्र गोपीचंद बारई (28 रा.साहुली),जयदेव सोमाजी उरकुडे ( 33 रा.साहुली ) असे आहेत.