

गोंदिया (Gondia) :- गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये दोन वाघांचा मृत्यू नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ असल्याने पर्यटक सुद्धा या ठिकाणी पाहायला येत असतात. परंतु यातच आता दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन वाघांचा मृत्यू त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत झाला आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 22 तारखेला गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना T9 हा वाघ मृत अवस्थेत आढळला आणि याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार सर्व वन्यजीव प्राणी (Navegaon Nagzira Tiger Reserve) आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समिती द्वारा या वाघाचा पोस्टमार्टम करण्यात आला. त्या वाघावर असलेल्या खुणांनुसार दोन वाघाच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये T9 वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. T9 वाघ हा जवळपास 11 ते 12 वर्षांचा होता आणि हा वाघ 2016 ला गेल्या अनेक वर्षांपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये होता. पुन्हा 23 तारखेला T4 वाघिणीच्या चार बछड्यांपैकी एक हा कुजलेल्या मृत अवस्थेत वन कर्मचाऱ्यांना आढळून आला.
तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला त्याच्या शरीरावर सुद्धा अनेक खुणा आढळून आल्या त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यामध्ये नवीन वाघाचा प्रवेश झाला असून या नवीन वाघ आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इतर वाघांना इजा तर पोहचवत नाही ना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्या दृष्टीने आता सर्व वनकर्मचारी हे रोज नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅमेरे आणि गस्तीवर लावून नवीन वाघ कुठून आणि कसा असल्या बाबत माहिती घेत आहेत.