दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू

0

चंद्रपूर (Chandrapur) भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणाऱ्या दोघांचा दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुडगाव असे मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Two people living in Gurgaon in Chandrapur’s Bhadravati taluk died after consuming alcohol withdrawal medicine)

दारुने व्यसनाधीन झालेले गुडगाव येथील चार जण जाम जवळील शेडगाव जि. वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी दि.२१ मे रोजी सकाळी नऊ वाजता गेले होते. तिथे महाराजांनी दारू सोडण्याची औषध दिली. त्यानंतर ते सायंकाळी सहाच्या दरम्यान आपल्या गावी गुडगाव येथे परत आले. त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यामध्ये सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

——–

उजनी पात्रात बोट उलटली

सहा प्रवासी बेपत्ता

उजनी धरण पात्रात मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी कडे प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस )उलटली होती.यामध्ये एकुण 7 प्रवासी होते. त्यापैकी 1 जण पोहत नदीच्या किनाऱ्या आला होता. मात्र इतर सहा जण बेपत्ता होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबले होते. दरम्यान आज बुधवार रोजी सकाळीच एन डी आर एफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या-येण्यासाठी उजनी पात्रात लॉन्च द्वारे वाहतूक केली जाते. मंगळवार रोजी सायंकाळी कुगाव येथून गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), गौरव डोंगरे (वय 16 वर्षे) सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) कळाशीच्या दिशेने निघाला. बोट काही अंतरावर पुढे गेले असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने नदीपात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट पलटी झाली. यावेळी या बोटीत प्रवास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणीहून पोहत कळाशी (ता.इंदापूर) च्या किनाऱ्यालगत आले तर इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इंदापूर पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, घटनास्थळी दाखल झाली बोट कुठे पलटी झाली याबाबत तपास कार्य सुरू होते.
——————
भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ३ युवती आणि २ युवकांचा समावेश आहे. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्वजण नाशिकरोड परिसरातील रहिवासी असून मंगळवारी दुपारी रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. यामध्ये अनस खान दिलदार खान (वय 15),नाझिया इमरान खान (वय-15), मीजबाह दिलदार खान (वय 16), हनीफ अहमद शेख (वय 24) ईकरा दिलदार खान (वय -14) यांचा समावेश आहे. आदिवासी नागरिकांच्या मदतीने ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

—————-
आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी रुग्णालयात
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.
——————

नागपूरच्या दिशेन निघालेल्या बसला अपघात
केळझर येथे अपघातात 20 जण जखमी

वर्धा जिल्ह्यातील केळझर इथं दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे. भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने एसटी बसला ही धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्सची समोरची बाजू पुर्णपणे दबली गेली आहे. सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे खाजगी ट्रॅव्हल्स जात होती. ट्रॅव्हल्स केळझर इथल्या शहीद हरिभाऊ लाखे चौकात आली. त्याचवेळी समोरच्या बाजून एसटीची बस येत होती. ही बस वर्ध्यावरून नागपूरच्या दिशेन चालली होती. ट्रव्हल्सचा चालक गाडी भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी त्याला चौकात आल्यानंतर एसटी बस दिसली नाही. त्याने थेट समोरून या एसटीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एसटी आणि ट्रॅव्हल्सची समोरची बाजू पुर्ण पणे दबून गेली होती.
——————

तीन वर्षाच्या मुलीचा खून केला आईने
लिव्ह इन साथीदाराचा संशयाचा राग काढला म्हणून

लिव्ह इन’मध्ये सोबत राहणाऱ्या साथीदाराचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिने रागाच्या भरात स्वतःच्या तीनवर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. यानंतर स्वत:ही आत्महत्येचा विचार होता, पण तिने तो बदलला. नंतर मुलीचा मृतदेह घेऊन ती पोलीस ठाण्यात पोचली आणि खून केल्याचे तिने तिथे कबुली दिली. ही घटना नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.