

अमरावती(Amravati), 5 जुलै :- गेल्या 21 में 2024 रोजी गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचवटी कॉलोनी येथील एका बंद घराला लक्ष करून चोरट्यानी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटा मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख तसेच सीसीटीव्ही चा डिव्हीआर असा एकूण 37 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर प्रकरणाचा शहर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकाकडून समांतर तपास करीत असतांना पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी महबूब खान वल्द समीउल्ला खान , वय 31 रा. लालखडी, मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबीर, वय 31 रा. नालसाबपुरा यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सदर गुन्ह्यासह पोलीस आयुक्तालय हद्दीत केलेल्या एकूण 12 गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून 12 घरफोडीच्या गुन्ह्यातील 7 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमरावती शहरातील घरफोडींच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरीता मा. पोलीस आयुक्त, नविनचंद्र रेडडी पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे साहेब यांनी गुन्हे शाखा यांची मिटींग घेवून सदरचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेशीत केल्याने गुन्हे शाखा युनिट क. २ चे पथकाने गुप्त माहितीचे तांत्रीक विश्लेषण करून पथकाने अहोरात्र प्रयत्न करून सदरचे गुन्हे उघडकिस आणले