सामान्य नागरिकांना बसला फटका

0

एसटीच्या दोन बस वलगाव पुलावर पडल्या बंद; अमरावती परतवाडा दोन तास वाहतूक ठप्प
अमरावती (Amravati), 18 ऑगस्ट अमरावती परतवाडा रोडवर वलगाव रेल्वे पुलावर गेल्या दोन तास वाहतूक ठप्प झाली. याचा फटका पोलीस विभाग,अँब्युलन्स व सामान्य नागरिक यांना चांगलाच बसला.

अत्यंत वर्दळ असलेल्या वलगाव पुलावर एस.टी. महामंडळाच्या दोन बस एकाच वेळी फेल पडल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यातली एक शिवशाही होती तर, दुसरी लालपरी होती. एक बस अमरावती कडे येत होती तर, दुसरी बस ही परतवाडा कडे निघाली होती. मात्र, वलगाव जवळच्या पुलाच्या मध्यभागी आल्यावर राज्य परिवहन महामार्गाच्या दोन बसेस अचानक फेल झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी (Traffic) झाली आहे.

निकृष्ट दर्जाच्या बसेसमुळे अनेक दुचाकी चालकांना व चारचाकी चालकांना मोठा त्रास झाला. काही ॲम्बुलन्स देखील या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. अनेक रुग्णांचे हाल देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे महिलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे.