

राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तुषार गिऱ्हे व महेश जोशी यांना दिल्या नवीन जबाबदाऱ्या
नागपूर (Nagpur):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पेतून आणि आशीर्वादाने स्थापन झालेल्या “मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या” मुंबई (Mumbai) व नागपूर विभागातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संघटनेचे प्रमुख विश्वस्त योगेश परुळेकर यांच्या हस्ते आज करण्यात आल्या.
पूर्व विदर्भ विभागीय संघटक महेश जोशी नागपुर जिल्हा अध्यक्षपदी तुषार गिऱ्हे यांची नेमणूक करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त विजय जाधव, अध्यक्ष गौरव वालावलकर, कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण, सरचिटणीस अमित शिंदे, चिटणीस सौ. नेहा भगत, कार्यकारिणी सदस्य विवेक उमासरे उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.