निर्धार मेळाव्यात तुपकरांचा लोकसभा लढण्याचा निर्धार

0

 

बुलढाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तुपकरांना शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेले जामीन रद्द करून त्यांना अटकेत ठेवा, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. रविकांत तुपकरांना पुन्हा जामीन मिळतो का?, तुरुंगात जावे लागते का? यावर आज न्यायालयात फैसला होणार आहे. त्याआधीच रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गर्दे हॉल, बुलढाणा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी तुपकरांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या भावना समजून घेऊन कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराला लागण्याचे आवाहन केले. याशिवाय निकाल जर विरोधात आला तर मी तुरुंगातून निवडणुक लढणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live