
अमरावती – संभाजी भिडे समर्थक उद्या 15 ऑगस्ट रोजी भगवा रॅली काढत आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली, भिडे यांच्या चाहत्यांचा मला फोन आला होता, तिरंगासोबत भगवा रॅली काढत आहे, ते ठीक आहे. हे वादग्रस्त नाही, भगव्या सोबत तिरंगा हा ठेवावा भगवाच्या माध्यमातून तिरंग्याचा अवमान होऊ नये. मुळात भिडेंना आम्ही चांगला माणूस समजत होतो, पण त्यांचे काही वक्तव्य चुकीचे आले असेही आ बच्चू कडू म्हणाले.