नाट्यकर्मी प्रभाकर आंबोणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

0

– दोन अंकी नाटक ‘पुरुष’ चा विशेष प्रयोग

नागपूर (Nagpur), 1 एप्रिल
शेफाली युनिट आणि नटवर्य प्रभाकर आंबोणे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाट्यकर्मी, अभिनेते प्रभाकर आंबोणे यांचे 75 व्या वर्षात पदार्पण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी सत्कार शनिवार, 5 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्त सत्कारापूर्वी दुपारी 2 वाजता अरुणोदय नाट्य संस्था आणि शेफाली युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ या त्यांच्या गाजलेल्या 2 अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र टाईम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, तसेच पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, नरेश गडेकर, डॉ. विनोद इंदूरकर, डॉ. रंजन दारव्हेकर, अजय पाटील, संजीव कोलते आदींची उपस्थिती राहणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना नाट्यक्षेत्रातील रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शेफालीचे अध्यक्ष अशोक आग्रे, उपाध्यक्ष डॉ. अभिजित अंभईकर, कोषाध्यक्ष तुषार नायडू यांनी केले आहे.