BIT महाविद्यालयात स्व. ऍड. बाबासाहेब वासाडे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

0

बल्लारपूर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज स्व. ऍड. बाबासाहेब वासाडे यांचा श्रद्धांजली कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री. संजय वासाडे, संचालक डॉ. रजनीकांत मिश्रा, डीन, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मौन पाळून करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री. संजय वासाडे, पॉलीटेक्नीक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीकांत गोजे, संस्थेचे डीन डॉ. झेड. जे. खान, डॉ. सत्यनारायण, स्टुडंट्स डेव्हलोपमेंट सेल चे प्रमुख डॉ. अर्चना निमकर, एम बी ए चे विभाग प्रमुख डॉ. सुधीर पोडे, श्रीमती लीना पोटदुखे, बीआयटी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत निमसटकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत स्व. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारसरणीचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे आयोजन तिसऱ्या इमारतीमधील सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन श्री, अमोल चवरे यांनी केले. उपस्थित सर्वांनी स्व. बाबासाहेब वासाडे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.