

मंगरूळपीर (Mangrulpir):- स्थानिक श्री.वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते श्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ. राठोड साहेब व प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले यांच्या मार्गदर्शनात मा. मुख्यमंत्री व मा. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत व शासनाच्या एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण (Tree plantation) करण्यात आले.
यावेळी विविध उपक्रम राबवून श्री वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिवसाचे विशेष महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. व वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले यांनी पटवून दिले व विद्यार्थ्यांसाठी श्री वसंतराव नाईक(Shri Vasantrao Naik)यांच्या जीवन व कार्यावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. व आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले, राष्ट्रीय सेवा (National Service) योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.तायडे तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ. एस.ए.राठोड, प्रा.डॉ.एन.बी. मठपती व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एक पेठ मा के नाम या उपक्रमांतर्गत प्रत्येकांनी एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला. महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ.एस.एम. वडगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून श्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
Mangrulpir distance
Mangrulpir map
Mangrulpir temple
Tree plantation in India
Tree plantation near me
Tree plantation Day
Tree plantation introduction
Tree plantation ideas
Tree plantation project