अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारे मंगरूळपीर येथे वृक्षारोपण

0
अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारे मंगरूळपीर येथे वृक्षारोपण
अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारे मंगरूळपीर येथे वृक्षारोपण

 

मंगरूळपीर (Mangrulpir) :- 

पर्यावरण जनजागृती करिता अखिल भारतीय ग्राहक पंचायतने उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या अंतर्गत मंगरूळपीर येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत (All India Consumer Panchayat) द्वारे विविध शासकीय कार्यालय परिसरात स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरण चा ढासळता समतोल ही समस्या पाहता ग्राहक चळवळ सक्रियपणे राबवणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतने जनजागृतीचा वसा घेतला आहे. जनमानसात वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्याकरिता ग्राहक पंचायत मार्फत वृक्षारोपण व संवर्धन अभियान राबविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

त्या अंतर्गत आज शहरातील शासकीय कार्यालय पोलीस स्टेशन, महसूल विभाग, नगरपरिषद या परिसरात वृक्षारोपण (Plantation)  करून अभियानाचा प्रारंभ केला आहे. त्या उपक्रमात ठाणेदार किशोर शेळके, तहसील कार्यालयात कार्यरत आकाश दिवाने, नगर पालिकेचे गणेश खोडे,गजानन तिडके,शरद इंगोले यांचे सह संबंधित कार्यालयात कार्यरत कर्मचारी उपस्थित होते. तसेच तालुका ग्राहक पंचायत संपर्क कार्यालय राठी नगर येथील बगीच्या मध्ये ज्येष्ठ महिला श्रीमती कमला राठी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अभियानाच्या यशस्वीते करिता ॲड.सुधीर घोडचर यांचे मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष संजय राठी, तालुका सचिव गजानन व्यवहारे,प्रा डॉ अनंत शिंदे,सुनील भुतडा,गोपाल खिराडे,निलेश कदम,अरविंद भगत,विजयानंद मोरे,गणेश राऊत,प्रमोद पाटील,पुष्कर राठी इत्यादी सह अन्य सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.