नागपूर Nagpur – बँकेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केले.निर्मल अर्बन कॉ ऑप बँकेच्या Nirmal Urban Co-op Bank वतीने नागपुरातील धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान येथे आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत उदघाटनाचे वेळी प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी निर्मल अर्बन कॉ-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे हे होते.
या वेळी नागपूर जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, उपनिबंधक तसेच निर्मल बँकेचे नोडल अधिकारी सुनील सिंगतकार, बँकेचे उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, संचालक उमाजी कोहळे, गणेश नाखले, मुकुंद पांढरे, किशोर कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत प्रामुख्याने के वाय सी नॉर्म्स, सायबर सेक्युरिटी, रिकव्हरी मॅनेजमेंट, सरफेसी ऍक्ट आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर विषयतज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी रुपकुमार राव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

















