पर्यटकांनी जाणून घेतला श्री बेनिगीरी शिवमंदिराचा इतिहास

0

नागपूर, 13 ऑक्‍टोबर
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. निलेश गठणे(भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना वारसा सहल पर्यटनाचा अनुभव देण्‍यासाठी श्री बेनिगिरी शिवमंदिर, बेनिगीरी वाडा, नागपूर येथे वारसा सहलीचे रविवारी आयोजन करण्‍यात आले होते. या सहलीला पर्यटकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला.
एमटीडीसी कार्यालयातून सकाळी निघालेली ही सहल एमटीडीसी व सखा यांच्या “द नागपूर टेल्‍स”, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्‍यात आली. बेनिगिरी शिवमंदिराच्‍या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या वारसा स्थळाच्या वास्तुशिल्प, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकडे लक्ष वेधणे हा त्‍यामागील हेतु होता.

श्री बेनिगिरी शिव मंदिर हे चिटणीस पार्क, महाल येथील या प्राचीन मंदिरातील 15 शिवलिंग, श्रीयंत्र, 14 नंदी, गणेश, अन्नपूर्णा, आणि नाग यांच्‍या मूर्ती पाहून पर्यटक भारावून गेले. त्‍यांनी अतिशय उत्‍सूकतेने मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि हा अद्वितीय अनुभव प्राप्‍त करून द‍िल्‍याबद्दल मा. श्री दिनेश आ. पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी यांचे आभार मानले.