

आनंदवन व हेमलकसा सामाजिक पर्यटन सहलीला उत्तम प्रतिसाद
नागपूर (Nagpur)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या आनंदवन व हेमलकसा सामाजिक पर्यटन सहलीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी या दोन्ही सामाजिक प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया जाणून घेतली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व जनार्दन स्वामी योग्याभ्यासी मंडळ, नागपूर यांच्या संयूक्त विद्यमाने आयोजित या आनंदवन व हेमलकसा सामाजिक पर्यटन सहलीत 18 पर्यटका सहभाग झाले होते. त्यांनी आनंदवनच्या 500 एकर जागेत पसरलेल्या कुष्ठरोग सेवा समितीचे विविध प्रकल्प, आरोग्य केंद्र, अंधांसाठी, मूकबधिरांसाठीची विशेष शाळा, प्रौढ व अपंगांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटीरोद्योगांची माहिती घेतली. बाबा आमटे यांनी या प्रकल्पासाठी दिलेल्या योगदानाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी यावेळी घेतला.
नंतर हेमलकसा येथील 3 नदयांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमला भेट दिली, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्याशी संवाद साधला. तेथील वन्यजीवांचा डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी असलेला ऋणानुबंध जवळून अनुभवला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना आनंदवन आणि हेमलकसा या सामाजिक पर्यटन स्थळाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश आ. कांबळे यांनी केले आहे.
सदर सहलीच्या माहितीकरिता व बुकींगकरिता श्रीमती वैशाली भांडारकर मो.नं. 9503966877 आणि श्रीमती पुजा कांबळे मो. नं. 8055759232 कार्यालयीन संपर्क क्र. 0712-2533325 यांच्याशी पर्यटकांनी संपर्क करावा.