

नागपूर(Nagpur), 10 जून :- महाराष्ट्र शासन आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर हे नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर सोमवारी (10) रुजू झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. उपायुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी श्री. चारठाणकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांची भेट घेतली. त्यांनी मनपाच्या विविध कार्याची माहिती जाणून घेतली.