उद्या ऐतिहासिक श्रीरामनवमी शोभायात्रा

0

84 चित्ररथ

नागपूर  (Nagpur) -देशाच्या ह्रदयस्थानी असलेल्या नागपूरची ऐतिहासिक गौरवशाली सांस्कृतिक परंपरा असलेल्या श्री पोद्दारेश्वर श्रीराम मंदिराच्या भव्य शोभायात्रेचे यंदा 58वे वर्ष आहे. उद्या बुधवारी निघणाऱ्या शोभायात्रेत यंदा 84 चित्ररथ सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता मंदिर परिसरातून श्रीराम रथाचे पूजन झाल्यावर शोभायात्रा प्रारंभ होईल अशी माहिती पुनितपोद्दार यांनी पत्र परिषदेत दिली.1967 साली श्रीराम मंदिराच्या या शोभायात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रवीण गुंड, किशोर पाटील, रामकृष्ण पोद्दार, सुरेश अग्रवाल, विपीन पोद्दार, संतोष काबरा आदी उपस्थित होते. यासोबतच पश्चिम नागपूर रामनगर राम मंदिर तसेच बेलीशॉप मोतीबाग येथील शिव मंदिरातूनही उत्तर नागपूरचो श्री राम शोभायात्रा निघणार आहे.
मुख्य रथावर होणार अयोध्येतील राम लल्लांचे दर्शन
श्री रामललाच्या अयोध्येतील मूर्तीची प्रतिकृती आरूढ असलेल्या मुख्य रथाची निर्मिती धनराज पेटकर परिवारातर्फे कलात्मक पद्धतीने साकारली आहे. या रथाच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठित रामललाचे हुबेहुब दर्शन भाविकांना होईल. या रथाची विद्युत सजावट श्याम बुर्रा, इंदोर यांनी केली आहे. दरवर्षीप्रमाणे जगन्नाथाच्या रथाप्रमाणे भाविक या रथाला ओढत शहर परिक्रमा करतील.
आकर्षक नृत्य
शोभायात्रेच्या प्रारंभी 108 मंगल कलश धारी कुमारीका सहभागी होणार असून त्यानंतर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध राज्यातील पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण पथके करतील. गांधीबाग रोलर स्केटिंग क्लबतर्फे शैलेंद्र पाराशर यांच्या नेतृत्वात स्केटिंग नृत्य, लोटस रोलर स्केटिंग क्लबतर्फे कमलेश पांडे यांच्या नेतृत्वात स्केटिंग नृत्य चांदूराम दरबार सेवा मंडळ जरीपटकाच्या सौजन्याने सनमुखदास सेतिया याच्या नेतृत्वात पारंपरिक छेज नृत्य. लोटस कल्चरल व नटराज क्रीडा मंडळ – आदीवासी कोरकू चिटकोरा. सार्वजनिक खदान दुर्गा माता मंदिर-गरबा नृत्य. युवक लांसर्स क्रीडा मंडळ-लोकनृत्य राहणार आहे.
नयनरम्य चित्ररथ आकर्षणाचे केंद्र
– रामेश्वरम दर्शन,
– मार्कंडेश्वर
– वाराह अवतार
– श्री हनुमानांच्या खांद्यावर श्रीराम लक्ष्मण
– शिव तांडव
– श्री हनुमान
– संत तुकाराम व शिवाजी महाराजांना विठ्ठलाचे दर्शन
– धर्माचा शंखनाद
– भगवान वाल्मिकीत श्रीराम, लक्ष्मण सीता
– प्रभू श्रीरामांचा त्रिरुप दर्शन
– रामकथा गायन करताना लवकुश
– ह्रदयात श्री सीताराम
– श्रीराम राज्याभिषेक
– महांकालची शाही यात्रा
– नवनाथ दर्शन
– शिव तांडव व महादेवांची वरात
– उज्जैनचे महांकाल व पंचमुखी हनुमान दर्शन
– कैलास पर्वतावर शिव परिवार
– शबरीचे बोरं
– तिरुपती बालाजी व लक्ष्मी दर्शन आदी आकर्षक चित्ररथ यावेळी भाविकांना बघायला मिळणार आहे.