

अमरावती amrawati –शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या काँग्रेसचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा असल्याची माहिती काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. हल्लाबोल करण्याची वेळ या निष्क्रिय सरकारमुळे आली आहे. अमरावती विभागात या वर्षी एक हजाराच्यावर शेतकरी आत्महत्या झाल्यात. त्यापैकी फक्त 400 आत्महत्या पात्र करण्यात आल्या. सरकार कोणासाठी चाललंय? मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही, शेतकरी मोठा नाही व्हावा, फक्त उद्योगपती मोठा व्हावा ही सरकारची इच्छा आहे. अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.