नागपूर मेट्रो स्थानकांवरील प्रसाधन गृह आता ‘टॉयलेट सेवा ऍप’ वर

0
नागपूर मेट्रो स्थानकांवरील प्रसाधन गृह आता ‘टॉयलेट सेवा ऍप’ वर
toilets-at-nagpur-metro-stations-now-on-toilet-seva-app

‘टॉयलेट सेवा ऍप’ द्वारे नागपूर मेट्रोमधील प्रसाधन गृहांचे स्थान जाणून घ्या

नागपूर (Nagpur) :- दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिप मध्ये मेट्रोने ऑनलाईन प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे याच शृखंलेत महा मेट्रोच्या वतीने नागपूर मेट्रो मेट्रो स्थानकांवरील प्रसाधनगृह आता ‘टॉयलेट सेवा ऍप’ च्या माध्यमाने प्रसाधन ग्रहांचे स्थान जाणून घेणे देखील आता शक्य होणार आहे.

नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) स्थानकांवर महिला,पुरुष व दिव्यांगजन यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था केली आहे. ‘टॉयलेट सेवा ऍप’ हे मोबाईल ऍप अमेरिका स्थित आयटी इंजिनियर श्री. अमोल भिंगे यांनी बनविले आहे. हे ऍप निशुल्क असून यामुळे महिला व वृद्ध नागरिक,विद्यार्थी आणि इतर नागरिक यांना प्रसाधनगृह शोधण्यासाठी या ऍपद्वारे मोठी मदत होणार आहे. टॉयलेट सेवा ऍप ‘स्वच्छ प्रसाधनगृह’ अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे प्रसाधनगृहातील नीटनेटकेपणा,स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, नळ व बेसिन यांच्यामध्ये काही बिघाड असल्यास तो या ऍपद्वारे संबंधित संस्थेपर्यंत तक्रार/सूचना या स्वरूपात पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. तसेच संबंधित संस्थेने तक्रार निवारण केल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याचा अभिप्राय मिळणार आहे.

नागपूर मेट्रो आणि टॉयलेट सेवा यांच्या समन्वयामुळे नागपूर मेट्रोच्या (Maharashtra Metro Rail Corporation Limited) प्रसाधनगृहांची अद्यावत माहिती नागरिकांना/प्रवाशांना जाणून घेत येईल. तसेच प्रसाधनगृहांच्या संबंधीची तक्रार/सूचना ऍप द्वारे नोंदविता येणार आहे. टॉयलेट सेवा ऍप हे प्लेस्टोर आणि आयओएसच्या माध्यमाने डाउनलोड करू शकता किंवा प्रसाधनगृह येथे उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून देखील डाउनलोड करू शकता.

• श्रावण हर्डीकर,व्यवस्थापकीय संचालक,महा मेट्रो : “टॉयलेट सेवा ऍप” हा एक स्तुत्य उपक्रम असून या ऍपच्या वापरातून स्टेशन परिसरातील प्रसाधनगृहांमध्ये नागरिकांना आमूलाग्र बदल करणे शक्य होणार आहे.

Nagpur railway station
Nagpur is famous for
NMC Nagpur property tax receipt
Index number for property tax Nagpur
NMC property tax Nagpur online
Nagpur which state
nagpur.gov.in application form
Nagpur in which state in Map