
नागपूर Nagpur :डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या बहुचर्चित प्रश्नी आज सोमवारी 26 जूनला निघणा-या ‘एल्गार मोर्चाचे रुपांतर आता छत्रपती शाहू महाराज अभिवादन रॅलीत होणार आहे. सलग 157 दिवस संघर्ष करणाऱ्या कृती समितीच्या माध्यमातून रविवारी उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांच्या अध्यक्षतेत धरमपेठ निवासस्थानी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवन प्रश्रावर बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी अंबाझरी भवन प्रश्नावर अतिशय सकारात्मक भूमिका सरकारची असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितित सदरची जमीन खाजगी संस्थेला हस्तांतरीत करण्यात येणार नाही. खाजगी यंत्रणे मार्फत विकास करण्यात येणार नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची निर्मिती शासन स्तरावरुनच करण्यात येणार असल्याची ग्वाही कृती समिति सदस्यांना दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत आमदार विकास ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी विपीन इटनकर ,किशोर गजभिये,डाॅ. धनराज डहाट, बाळु घरडे, सुधीर वासे आणि समिति सदस्य उपस्थित होते.
रॅलीचीव्हेरायटी चॊकातुन सुरवात होवुन संविधान चॊकात (डाॅ. आंबेडकर पुतळा परिसरात) अभिवादन सभेत रुपांतर होणार आहे. धरणे आंदोलन स्थळी (अंबाझरी) राजरत्न आंबेडकर यांनी भेट देत मार्गदर्शन केल्याची माहिती किशोर गजभिये आणि बाळु घरडे (संयोजक)डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कुति समिति यांनी दिली