

🌻 li.आनंदी°पहाट.il 🌻
मातृवंदनाची..कृतज्ञतेची
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
आज जागतिक मातृदिन
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
💞🥀🤱🌸🙏🌸🤱🥀💞
जननी जन्मभूमिश्च
स्वर्गादपि गरीयसी ।
भारतीय संस्कृतीत मातेचे स्थान सर्वात महत्त्वाचे. यामुळेच आपण राहतो त्या भूमीलाही मातृभूमी म्हणतात. या मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा केली जात नाही. हा आदर्श ठेवलाय तो आमच्या प्रभू श्रीरामानी, सोन्याच्या लंकेपेक्षाही मला माता आणि मातृभूमी अधिक प्रिय आहे असे लक्ष्मणाला सांगतात.
हे जग सुरळीत चालतेय.. जगातील जे जे काही मंगल.. कल्याणकारी.. शुभ घडते.. लोक सुखात जगू शकतात ते या मातृत्व भावनेमुळेच. या मातृत्वभावाचा महिमाच असा की प्रत्यक्ष श्रीराम असो वा श्रीकृष्ण यांनाही मातेच्या उदराचा आसरा घ्यावा लागला. या मातृत्व भावनेतील दडलेल्या प्रेमामुळेच गुरुंनाही “माऊली” संबोधले जाते.
आज मातृदिनाला प्रथम वंदन करुया वाघाचे दात मोजणाऱ्या भरताला जन्म देणाऱ्या शकुंतला मातेला. या भरतामुळे देशाचे नाव भारत आहे.
आई म्हणजे जगात परमेश्वरी अस्तित्वाचा बोलका पुरावा. आई म्हणजे सहनशीलतेचा कळस. असह्य कळा सोसत श्वास रोखून बाळात श्वास येताच त्या वेदना क्षणात विसरत आनंदाश्रूंचा अभिषेक घालते ती माताच. सृजनाचा तर जन्मसिद्ध हक्कच प्राप्त आहे. मातेच्या अपूर्व त्यागानेच ही सृष्टी सजीव आहे. म्हणून आई आणि मातेसमान व्यक्तीबद्दल कृतज्ञता.. सन्मान करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन साजरा केला जातो.
पृथ्वीच्याही उदारतेला लाजवेल असे विशाल.. उदार.. त्यागी अंतःकरण लाभलेय ते आईलाच. आनंद होवो अथवा संकट येवो भावनांना वाट करुन देतांना पहिली आठवण होते आईची. जगाने पाठ फिरवली तरीही असे एकच व्दार लेकरांसाठी सदैव उघडे असते ते म्हणजे आईचे. तिच्यापाशी पराकोटीची क्षमाशीलता आहे. निस्वार्थवृत्ती आहे. ती सदैव लेकरांच्या आनंदातच आपला आनंद शोधते.
कोणत्याही धनवानाला जगात विकत घेता न येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प्रेम. तिच्या रागातही प्रेमच दडलेले असते.
या भारत देशात तर आईच्या कर्तुत्वाला तोडच नाही. विरमाता जिजाबाई.. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, बाया कर्वे.. सिंधुताई सपकाळ.. अश्या किती किती म्हणून मातांची थोरवी वर्णावी.
गीतरामायणासारखे अव्दितीय काव्य लिहणारे गदिमा हे जग आम्हांला दाखविणाऱ्या.. सुपंथासाठी संस्कार करणाऱ्या.. त्यासाठी कष्ट सोसणाऱ्या मातेला गुरु मानून वंदन करतात. तिनेच धर्मबीजे मनात रोवल्यानेच धर्म टिकलाय. माता हीच आमच्यासाठी रमा.. उमा आणि शारदा.
आई हेच जगताचे दैवत. जिच्या संस्कारानेच ही संस्कृती टिकून आहे. जिचे ऋण जन्मोजन्मी फेडणे अशक्य आहे.. अशा परमेश्वरी रुपात वावरणाऱ्या समस्त मातांना साष्टांग दंडवत.. वंदन.
🌹🥀🤱🌸🙏🌸🤱🥀🌹
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस
जिण्यालागी आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली पाउलांस
गुरु आद्य तू माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली पाउलांस
तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली पाउलांस
उमेचे, रमेचे, जसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली पाउलांस
🌺🌿🌸🔆🤱🔆🌸🌿🌺
गीत : ग. दि. माडगूळकर ✍
संगीत : राहुल घोरपडे
स्वर : सुरेश वाडकर
🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌹🙏 मातृदेवो भव 🙏🌹
🦋 सुमंगल प्रभात 🦋
१२.०५.२०२४
🌻☘🥀🌿🌺🌿🥀☘🌻