
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे काल भरदिवसा सुवर्णकाराच्या घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी सोने, चांदी व नगदी रोख रक्कम यासह तब्बल 75 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला होता. संजय मांडळे वय 54 वर्ष असे या मृतक सुवर्णकाराचे नाव असून मृतक मांडळे हे आपल्या घरी होते. इतर घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने हत्या करून घरातून 75 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तिवसा पोलिसांनी खुनासह चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. 24 तासानंतर अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आरोपी रोशन तांबटकर वय 25 राहणार देऊरवाडा याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली आरोपीने उडवा उडवीचे उत्तर दिले.
पोलिसांनी आरोपीला पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व आरोपीकडून 7 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला अशी माहिती विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, ग्रामीण अमरावती यांनी दिली.