‘या’ पैलवानांवर तीन वर्षांची बंदी

0

अहिल्यानगर (Ahilyanagar) , 3 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पैलवान महेंद्र गायकवाड ( Mahendra Gaikwad) आणि शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घातला होता.त्यामुळे या दोन्ही पैलवानांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.

पृथ्वीराज आणि शिवराज यांच्यातील अंतिम लढतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पृथ्वीराजने राक्षेला चितपट केले.मात्र, राक्षेला हा निर्णय मान्य नव्हता. यामुळे पंचांच्या निर्णयावर राक्षे प्रचंड चिडला होता. त्याने एका पंचांना थेट लाथ मारली. त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती. याबाबत राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर अंतिम लढतीत पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला दुसरा गुण दिल्याने महेंद्र गायकवाड याने नाराजी व्यक्त केली. या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. यावेळी गायकवाड याने आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप पंचांनी केली. पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढले. यामुळे महेंद्र गायकवाडवरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयामुळे दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली आहे.