

गोंदिया (Gondia) :- गोंदिया तालुक्यातील सावरी/ लोधीटोला येथे १२ आॅक्टोंबरला सायकांळच्या दरम्यान दुर्गा विसर्जनाकरीता गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच आपत्ती निवारण शोध बचाव पथक घटनास्थळाकड गाठून शोध मोहिम राबविली असता रात्री १ वाजेच्या सुमारास तिन्ही युवकांचे मृतदेह शोधून काढले.
या घटनेत आशिष फागुनला दमाहे(वय २१),अंकेश फागुलाल दमाहे(वय १९) या दोन भावंडासह यश गंगाधर हिरापुरे(वय १९)चा समावेश आहे.या घटनेमुळे दमाहे व हिरापूरे कुटुबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोकमय वातावरण आहे.घटनेची माहिती होताच गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी रात्रीलाच मृतक युवकांच्या घरी जात कुटुबियांचे सात्वन केले.
Gondia pin code number
Zp gondia
Gondia famous for
Gondia places to visit
Gondia famous food
Gondia district information
Gondia distance
Gondia News