चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच तीन नवे प्राथमिक आरोग्य केंद्र

0

 

चंद्रपूर : CHNDRAPUR
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर अधिक भर दिला असून आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी ६४ हजार कोटीचे पॅकेज दिले आहे. या पॅकेजमधून चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्याच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यात चिमूर
तालुक्यातील खडसंगी व जिवती तालुक्यातील पाटणचा समावेश होता.

पत्रकार परिषदेला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन उपस्थित होते, चंद्रपूर जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीमधून तीन नविन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरगाव व उसेगाव येथे आरोग्य उपकेंद्र निर्मितीला मंजूर देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सर्वसोयीयुक्त असलेली एक लॅब निर्माण करण्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत १७ लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून ५ लाख लाभार्थ्यांचे कॉर्ड तयार झाले असल्याचे त्या म्हणाल्या. या योजनेचा लाभ देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचे कामकाज धीम्या गतीने चालविणान्या डिनला बदलविण्यात आले असल्याचे सांगून आता नव्या इमारतीच्या बांधकामालाही वेग आल्याचे म्हटले.