

Marathi News: तिन्ही मृतक नागपूरच्या वाठोडा परिसरातील रहिवासी
सध्या उन्हाळ्याचा तळाखा चांगलाच वाढला आहे. नवतपाचे दिवस असल्याने उन्हात बाहेर निघणं अतिशय कठीण झाले आहे त्यामुळे पिकनिक म्हणून शहरालगत असलेल्या तलावात पोहण्याचा जाण्याचा निर्णय वाठोडा परिसरात राहणाऱ्या ३ मुलांच्या जीवावर बेतला.
हे तिन्ही मूल गुरुवारी दुपारी उन्हाची लाही कमी व्हावी म्हणून पोहण्यासाठी मटकाझरी च्या तलावात गेले होते. उन्हाचा तळाखा वाढल्या असल्यामुळे पाणी खोल असणार नाही अशी समज करून हे तिघेही खोल पाण्यात गेले मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे तिघांचाही बुडून मृत्यू झाला. शहराचे प्रसिद्ध गोताखोर जगदीश खरे यांनी पोलिसांसह मिळून उशिरा रात्री पर्यंत तिन्ही मृतदेह शोधून काढले. मृतकांमध्ये ३५ वर्षीय जितेंद्र शेंडे, संतोष बावणे वय २५ वर्ष आणि निषेध पोपट वय १२ वर्ष या तिघांचा समावेश आहे. कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय देविदास ठमके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.