‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातात तिघांचा मृत्यू

0

भोर घाटातील दुर्घटनेत 8 जण जखमी

पुणे(Pune), 10 मे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर भोर घाटाजवळ आज, शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेलमुळे नियंत्रण सुटल्याने दोन वाहने, एक कार आणि कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला. पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातातील जखमींना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.