

चंद्रपूर (Chandrapur):- नागभीड तालुक्यातील बाळापूर (खुर्द) येथे डिमदेव सेलोटे यांच्या पडक्या गोठ्यात एका बिबट ने तीन पिलांना जन्म दिला. ही घटना आज उघडकीस आली.गेल्या पंधरा दिवसापासून या गावात अनेकदा या बिबट मादीने हैदोस घातला होता.गावातील रात्रीच्या वेळी हल्ला करून अनेकांच्या बकऱ्या, गाय आणि वासरावर हल्ला करून त्यांना ठार केले होते यामुळे गांवात दहशतीचे वातावरण पसरले होते.
या बिबट मादीच्या हल्यात एक शेतकरी देखील दगावला होता. त्या मुळे गावकरी दहशतीत होते.आज सकाळच्या दरम्याम गावातील व्यक्तीने डिमदेव सेलोटे यांच्या पडक्या गोठ्यातून या बिबट ला बाहेर निघताना पाहिले.. व त्याने लगेच ही माहिती गावाकऱ्यांना दिली.. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता. त्या ठिकाणी तीन पिल्ले आढळून आले. सदर जन्म दिलेल्या ठिकाणापासून जिल्हा परिषदेची शाळा अगदी जवळ आहे.याची माहिती सरपंच कमलाकर ठवरे यांनी वनविभागाला दिली. वनविभागाने घटनास्थळ गाठून गावात बंदोबस्त केला आहे.
ही बिबट मादा पुन्हा त्या ठिकाणी येऊन आपल्या पिल्लाना घेऊन जाणार असल्याने कडेकोड बंदोबस्त गावात करण्यात आला आहे.यामुळे गांवात उत्सुकता व दहशतीचे वातावरण पसरले आहे.