टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी

0
people watching football game during daytime

मुंबई, ६ मे (Mumbai) : येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (Threat terrorist attack during T20 World Cup) दरम्यान वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी उत्तर पाकिस्तानकडून मिळाली आहे. अधिक माहिती अशी की, प्रो इस्लामिक स्टेटने क्रीडा स्पर्धांदरम्यान हल्ले करण्याची योजना आखली आहे. आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबाबत म्हटले आहे आणि समर्थकांना यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.  (Threat terrorist attack during T20 World Cup)

टी-२० विश्वचषकाचे सह-यजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यात सुरक्षाविषयक चिंता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. टी-२० विश्वचषकात सामील असलेल्या सर्वांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहेत, असे आश्वासनही ग्रेव्हज यांनी दिले.

दरम्यान बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी आयसीसी टी-२० विश्वचषकादरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशीर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी मिळाली आहे.

१ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार असून अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५५ सामने होणार असून त्यात ४० गट सामने होतील आणि त्यानंतर सुपर ८ सामने आयोजित केले जातील. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा आयोजित केली जात आहे.