बार्शी टाकळी येथे होणार्‍या समाधि सोहळयात दर वर्षी हजारो भाविक सहभागी

0

गोविंदमहाराजांचा जन्म इ.स. 1800 च्या आसपासचा तर मृत्यू 1888 सालचा आहे. गोविंदप्रभू यांच्या कार्याची महती देणारा तत्कालीन ग्रंथही आज उपलब्ध आहे. तोच या महापुरूषाच्या कार्याची आजही साक्ष देतो. गोविंद महाराज हे एकनाथ महाराजांचा अवतार असल्याची मान्यता असून चैत्र वद्य प्रतिपदा व व्दितीय असे दोन दिवस हा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.

बार्शी टाकळी येथे होणार्‍या समाधि सोहळयात दर वर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. त्यानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच किर्तन प्रवचन आणि महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम 13 व 14 एप्रिलला 2025 रविवार आणि सोमवार या दोन दिवसात आयोजित केला जाणार असून याला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.श्री.अनिरूध्द गोपाल.ष्ण क्षीरसागर महाराज आणि खोलेश्‍वर संस्थान विश्‍वस्त श्री. श्रीरामजी तुळशीराम येळवणकार (माजी पोलीस पाटील) अध्यक्ष, श्री. मदनलालजी रंगलालजी अग्रवाल उपाध्यक्ष, श्री. शेषरावजी नामदेवरावजी राजुरकर, श्री. चंद्रकांतजी मनोहररावजी वाटमारे श्री. आकाश मदनरावजी धात्रक, श्री. प्रशांत दिनकररावजी देशमुख, श्री. अशोक वामनरावजी म्हस्के, श्री. प्रफुलचंद्र नारायणरावजी माणीकराव व समस्त गावकरी मंडळी बार्शीटाकळी यांनी केले आहे.

खोलेश्‍वर मंदिराच्या आवारात गोंविद महाराजांची समाधी आहे. दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी याठिकाणी श्री.अनिरूध्द महाराजांचे किर्तन पूजन इत्यादी कार्यक्रम समाधि सोहळयानिमित्त होणार असून दही हंडी आणि प्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी्र होणार आहे. दिनांक 14 एप्रिल 2025 ला सकाळी पालखीची मिरवणूक निघणार असून त्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.