Election Results | एक्झिट पोलचे ‘ते’ आकडे ही सट्टा बाजाराची खेळी?

0

मुंबई :  लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आटोपताच विविध माध्यमांमधे झळकलेले निकालांचे आकडे आठवतात? सर्वदूर इतके सारखेच आकडे कसे येऊ शकतात, असा प्रश्न आपल्यापैकी कुणाला पडला होता? नाही? तर मग एका….

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाचा लाभ झाला, कुणाचे नुकसान झाले, वगैरे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. त्याची जो तो आपापल्या परीने उत्तरे देईलच पण, प्राप्त गंभीर माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक आर्थिक लाभ सटोडियांचा आणि सट्टा बाजाराचा झाला आहे. विशेषतः निकालापूर्वी सर्वदूर एकसारखी संभाव्य आकडेवारी जाहीर होण्याचे जे व्यवस्थापन सट्टा बाजाराने केले, त्यातून एकतर वस्तुस्थिती लोकांसमोर आली नाही. शिवाय, सट्टा बाजार तेजीत चालला. ४ जूनला जेव्हा प्रत्यक्ष आकडे समोर आलेत, तेव्हा अनेकांचा भ्रमनिरास झाला. काही पक्षात आनंदोत्सव, काही राजकीय पक्ष कार्यालयात निराशाजनक चित्र होते. पण सट्टा बाजार मात्र खूश होता. कारण सर्वाधिक सट्टा ‘चार सौ पार’ आणि भाजपा व काँग्रेसच्या पक्ष म्हणून निवडून येणाऱ्या जागांच्या संख्येवर लागला. यात लक्षावधी लोकांचे अंदाज चुकले आणि त्यांनी लावलेला पैसा बुडाला. सट्टा बाजार मात्र जिंकला. कारण लोकांचे अंदाज चुकले तरच त्यांचे नफ्याचे गणित खरे ठरणार होते. दुर्दैवाने यंदा सट्टा बाजाराने कोट्यवधी रुपयांचा खेळ जिंकल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा लोकांचा भ्रम कायम राहील अशी खेळी या व्यवसायातील लोकांनी खेळली होती असे सांगितले जाते. एक्झिट पोलचे, अपवाद वगळता, सर्वदूर झळकलेले सारखे आकडे हा देखील या व्यावसायिकांनी मॅनेज केलेला एक प्रयोग होता, अशीही धक्कादायक माहिती एका अनधिकृत सूत्राने दिली आहे. यंदाच्या एक्झिट पोलचे, अपवादानेच कुणाचे आकडे खरे ठरले. पण एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सट्टा खूप मोठ्या प्रमाणात खेळला/लावला गेला. बव्हतांश लोकांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर अवलंबून पैसा गुंतवला. अंदाज चुकले आणि सट्टा व्यावसायिकांचे फावले. अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा ‘गेम’ झाला.  निकालाच्या दिवशी सायंकाळी पंतप्रधानांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत कुणाच्याच चेहऱ्यावर जागा कमी आल्याचे दु:ख नव्हते. उलट आत्मविश्वास होता. कारण त्यांना या आकड्यांचा अंदाज होता. निकालाबाबत फसगत फक्त सट्टा लावणाऱ्या लोकांची झाली होती. आणि ती त्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी केली होती….

‘Those’ numbers of exit polls are speculation market ploy?