

फोटोत टिपलेला आनंदाचा साधा क्षण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकतो, याची ही हृदयस्पर्शी कहाणी
( South Africa) दक्षिण आफ्रिकेतील एक साधी घटना, जी एका फोटोमुळे संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय बनली. ही कहाणी आहे एका पाच वर्षांच्या मुलीची, जी एका सिंगल मदरची मुलगी आहे. एके दिवशी तिच्या आईने तिला दुकानात ब्रेड आणण्यासाठी पाठवले होते. ब्रेड विकत घेऊन परतताना, एका अनोळखी व्यक्तीने तिचा फोटो काढला. फोटोत तिच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद कैद झाला होता, ज्यामध्ये तिचा निष्पापपणा आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात तिचा निखळ आनंद कैद झाला आहे. लोकांच्या दबावाखाली ब्रेड कंपनीने तिला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले.
त्या बदल्यात आई-मुलीला दोन खोल्यांचे घर मिळाले असून मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार आहे.
फोटोत टिपलेला आनंदाचा साधा क्षण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकतो, याची हृदयस्पर्शी कहाणी