या शाळेने मारली बाजी

0

‘जागर स्वातंत्र्याच्या’ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर
आर. एस. मुडले इंग्लिश मीडियम व मॉडर्न स्कूल कोराडीने मारली बाजी

(Nagpur)एकदंत क्रिएशन नागपूर आयोजित ‘जागर स्वातंत्र्याचा’ ही आंतरशालेय देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा बॅनयन हॉल, चिटणवीस सेंटर येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

या स्पर्धेची संकल्पना मकरंद भालेराव यांची होती.

स्‍पर्धेचे उद्घाटन म्हणून भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, निश्चय फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. पवन ढीमोले, एकदंत क्रिएशन नागपूरचे अध्यक्ष मकरंद भालेराव, स्वरनिक इन्फोकॉमचे रोशन कावळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी संघटन मंत्री महाराष्ट्र व ज्येष्ठ प्रचारक प्रा. रवींद्र भुसारी होते तर विशेष अतिथी राहुल आसरे, चिटणीस सेंटरचे संजय जोग यांच्या हस्ते विजेत्या संघाला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

या समुह देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत नागपुरातील एकूण 25 शाळांनी सहभाग नोंदवला. दोन गटात घेण्यात आलेल्‍या या स्‍पर्धेत स्टेट बोर्ड गटातून प्रथम क्रमांक आर एस मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक प्रेरणा कॉन्व्हेंट, तृतीय क्रमांक गायत्री कॉन्व्हेंट महाल, उत्तेजनार्थ विद्यानिकेतन स्कूल यांनी प्राप्‍त केला. सीबीएससी गटातून प्रथम क्रमांक मॉर्डन स्कूल कोराडी, द्वितीय क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी , तृतीय क्रमांक सेवासदन सक्षम सीबीएससी स्कूल , उत्तेजनार्थ स्वामीनारायण स्कूल वर्धमान नगर यांनी पटकाविला स्पर्धेला परीक्षक म्हणून रसिका बावडेकर, सरोज देवधर लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वतेकरिता वैष्णवी कुंभलकर, अनुप उंबरकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अनघा पेंडके यांनी केले.