

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या एका पाणीपुरी विक्रेत्याने अनोखी ऑफर आणली आहे. केवळ 99,000 रुपयांमध्ये लाईफटाईम पाणीपुरीचा आनंद घेण्याची संधी ग्राहकांना देण्यात येत आहे. ही ऑफर शहरात चर्चेचा विषय बनली आहे. पाणीपुरी प्रेमींसाठी ही एक आकर्षक संधी आहे.
नागपुरात ९९ हजारांची पाणीपुरी! | Shankhanaad News #shankhnaadnews #live
उत्तर प्रदेशातील जौनपुरचे असलेले विजय मेवालाल गुप्ता वर्धा रोडवरील रहाटे कॉलनी चौकातील अमरज्योती पॅलेस येथे रोज संध्याकाळी 6 वाजता स्टॉल लावतात. त्यांचा हा मागिल तीन पिढ्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या पाणीपुरीने आधीच अनेकांची, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खाद्यप्रेमींची मने जिंकली आहेत. मागील 6 महिन्यांपासून सुरू केलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे ते चर्चेत आले आहेत.
– 99000 हजारांत आयुष्यभर पाणीपुरी खा
– लाडक्या बहिणींना 60 रुपयांत पोटभर पाणीपुरी
– सर्वसामान्यांना 195 रुपयांत पोटभर पाणीपुरी
– वार्षिक 5 हजार द्या 10 हजाराची पाणीपुरी खा
– 151 रुपयांची पाणीपुरी खा 21 हजारांचे पुरस्कार मिळवा
विजयच्या ऑफर्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. त्यांचा व्हीडिओ वायरल होत आहे. तेलीपुरा येथील रहिवासी आकाश शाहू याने 99 हजारांची ऑफर स्वीकारली आहे. विजय यांनी ही ऑफर त्यांना स्टँप पेपरवर लिहून दिली आहे.