
Naxalism
विद्यार्थी चळवळीचा राजकारणावरील political प्रभाव हा या देशाचा, देशाचाच कशाला, संपूर्ण जगाचाही ज्ञात आणि प्रचलीत असा history इतिहास आहे. विविध विद्यार्थी चळवळींचे कुठल्या ना कुठल्या political party राजकीय पक्षाशी असलेले कनेक्शनही आता नवलाईचे राहिलेले नाही. आणि म्हणूनच एखाद्या स्टुडंट्स मुव्हमेंटची, त्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या कार्यक्रम-उपक्रमातून जाणवणारी, डोकावणारी विचारधारा तितकीच महत्त्वाची असते. कारण ती, त्या चळवळीच्या प्रभावाखाली असलेल्या मोठ्या संख्येतील विद्यार्थी -कार्यकर्ते आणि उद्याच्या नागरिकांची वैचारिक बैठक – जीवनशैली निश्चित करणार असते.This is how the urban army of Naxal supporters is formed! अलीकडे बऱ्याच वेळा, अनेक ठिकाणी अशा चळवळीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विचार, आचार, उपक्रम, कार्यक्रमांमागे कुठलातरी राजकीय अजेंडा असतो. त्या राजकीय पक्षाच्या राजकीय गरजांचा, कार्यक्रमांचा छुपा अजेंडाही त्यात दडला असतो. त्यामुळे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठापासून तर अन्य विविध विद्यापीठे व महाविद्यालयात जोमात असलेल्या विद्यार्थी चळवळीच्या विचारांची बैठक आणि त्यामाध्यमातून राबविला जाणारा राजकीय अजेंडाही कपाळावर प्रश्नार्थक चिन्ह मिरवू लागला आहे. More dangerously, it has become more urban than rural as far as planning, financing, and nexus-building activities are concerned.
कारण, या चळवळी त्याच्या दॄश्य नेतृत्वापेक्षाही पडद्यामागील दिग्दर्शकांच्या दिशादर्शनानुसार प्रवाहीत होताहेत. अगदी, या चळवळी हिंसात्मक वळणावर मार्गक्रमित होणे आणि हव्या असलेल्या पक्षाची सरकारे स्थापित करण्यासाठी वा नको असलेल्या पक्षाची सरकारे विस्थापित करण्यासाठी देखील या विद्यार्थी चळवळींचा वापर-गैरवापर होऊ लागला आहे. हे खरेच की, विद्यमान सर्वच विद्यार्थी चळवळींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज नाही, पण काही बड्या महाविद्यालयात, काही जुन्या -निमांकीत विद्यापीठात कथित बड्या मंडळींच्या नेतृत्वात विद्यार्थी चळवळीच्या नावाखाली जो धिंगाणा चालला आहे, तो बघितल्यावर विद्यार्थी संघटनांचा वापर संघटनेबाहेरच्या नेत्यांद्वारे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्याऐवजी, त्यांचा स्वतःचा असा एक छुपा अजेंडा अंमलात आणण्यासाठी होतोय् हे एव्हाना स्पष्ट होऊ लागले आहे. परिणामी, ही आंदोलनं विद्यापीठाबाहेरील सत्ताकेंद्रांद्वारे नियंत्रित होत असल्याचेही दिसून येत आहे. जाधवपूर युनिव्हर्सिटी, जे एन यु, आई आई टी, दिल्ली युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, TISS ही त्याची वानगीदाखल उदाहरणे., instead of solving the academic problems of the students, it is becoming clear that they have a hidden agenda of their own. As a result, these movements are also seen to be controlled by power centers outside the university. Examples are Jadhavpur University, JNU, IIT, Delhi University, Mumbai University, TISS.
यापूर्वीच्या काही घटनाक्रमांची नोंद अतिशय चिंताजनक, धक्कादायक आणि एकूणच स्टुडंट्स मुव्हमेंटच्या मूळ उद्देशांवरच घाव घालणारी ठरली आहे. किंबहुना अशा काही मुव्हमेंट्स राष्ट्रविरोधी कॄत्यात सहभागी असल्याचे, कायदा व्यवस्थितपणे पायदळी तुडवून माओवादी विचारांच्या पखाली वाहण्याची हौस देखील त्या माध्यमातून भागवून घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चळवळीचा वापर डाव्या विचारसरणीची राजकीय जडणघडण मजबूत करण्यासाठी, त्याहीपेक्षा माओवादी, कम्युनिस्ट विचारांचा एक प्लॅटफॉर्म समविचारी लोकांसाठी तयार करून देण्यासाठी केला जात असल्याची वस्तुस्थिती त्यातून प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.
नक्षलवाद्यांची तळी उचलून धरणारी विचारशैली रूजवत विद्यार्थी दशेपासूनच ब्रेनवाॅश केलेले कार्यकर्ते घडविण्याची जबाबदारी याच मुशीतून तयार झालेली प्राध्यापक मंडळी इमानेइतबारे पार पाडत असतात. The faculty formed from this mush is carrying out the responsibility of creating brainwashed activists right from the student age, inculcating a style of thinking that supports the naxalites. संबंधित व्यवस्थापन तर काय, जणू त्यांच्यासाठीच राबत असते. माओवादी विचारांच्या आडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नक्षलवादी चळवळीसाठी शहरी भागात पोषक वातावरण, वैचारिक समर्थक, क्षमतावान कार्यकर्ते निर्माण करण्यासाठीची मशागत अशी महाविद्यालये -विद्यापीठाच्या प्रांगणातच होत असते. विद्यार्थ्यांचे समर्थन मिळवण्यासाठी काही वेळेला त्यांच्याशी संबंधित काही प्रश्न, समस्यांना हात घालायचा, असे प्रश्न सोडविण्यासाठीच या संघटना प्रयत्नशील, संघर्षरत असल्याचा देखावा निर्माण करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आपले छुपे अजेंडे राबवायचे हीच या विद्यार्थी चळवळीची रीत, नियत असते. अर्बन नक्क्षलिझम नावाचा एक उपक्रम यशस्वी होतो तो अशा योजनाबद्ध नियोजनातून….सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेली अथवा विद्यमान सत्तेला आव्हान देणारी तरुणाई हे नक्षलवाद्यांचे नेहमीच टारगेट राहिले आहे.
देशभरातील विविध आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी सारख्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थी त्यांच्या मागण्या, अभ्यासक्रमाबाबतच्या समस्या, हाॅस्टेलचे प्रश्न यासाठी आंदोलनं करतात. रस्त्यावर उतरतात, त्यांच्यात जोश असतो, उत्साह असतो, नवे काही घडवण्याची, क्रांती घडवून आणण्याची ताकद असते… माओवादी, कम्युनिस्ट चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींना एवढे गुणविशेष पुरेसे असतात. अशा तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी थोडेसे भावनात्मक, काही सामाजिक, काही न्यायासाठीची लढाई वाटतील असे मुद्दे, पुढे करून तंत्रशिक्षणाशी संबंध नसलेला अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक समूह बेमालूमपणे या आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरतो. आणि मग हळूच त्या गर्दीचा फायदा उचलत छुपा माओवादी अजेंडा अंमलात येतो. तंत्रज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते आपण एका सामाजिक प्रश्नावर भांडतोय्. आणि बाहेरून आलेला विद्यार्थ्यांचा गॄप आपल्या हक्कांसाठी लढण्याकरता आपल्या साथीला उभा ठाकला आहे. वस्तुतः सत्य काही वेगळेच असते. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या मुद्यांवरच्या लढाईच्या आड, जंगलात राहून शस्त्रांच्या साह्याने सरकारशी लढणाऱ्या नक्षल्यांसाठी शहरी भागात समर्थकांची फौज उभी करण्याच्या कारस्थानाचा तो एक भाग असतो….