“ही दोस्ती तुटायची नाय..”..ते होर्डींग चर्चेत!

0

 

(Nagpur)नागपूर : (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन (Ajit Pawar)अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजप-शिवसेना सरकारमध्ये अलीकडेच सहभागी झाला असला तरी (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील राजकीय मैत्री मात्र, जुनी आहे. दोघांचेही वाढदिवस २२ जुलै म्हणजे एकाच दिवशी आहेत. नागपुरात या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डींगची चर्चा सध्या सर्वदूर रंगते आहे. “राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस आणि राजकारणातील ‘दादा’ अजित दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजकूर असलेले होर्डींग अजित पवार समर्थक व (NCP spokesperson Prashant Pawar)राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी प्रदर्शित केले आहे.

या होर्डींगची “ही दोस्ती तुटायची नाय” अशी कॅचलाईन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो देखील ‘या’ बॅनरवर छापण्यात आला आहे. दरम्यान, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काही ठिकाणी बॅनर लागले असून, त्यावर कोणाचेही नाव नसल्याची माहिती पुढे आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे यांना डिवचण्यात आले आहे. या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो न लावता शेतकऱ्याचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. ‘एक रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण?’ असा मजकूर या होर्डिंग्जवर टाकण्यात आलाय्.

अलीकडेच्या नागपूर दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून कलंक शब्दाचा वापर केला होता. त्यावर भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्याचे हे भाजपाने दिलेले प्रत्युत्तर मानले जाते….