गोमातेच्या संरक्षणासाठी या फाउंडेशनी घेतला पुढाकार

0

श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना आणि भूमिपूजन रविवारी

 

 नागपूर(Nagpur). गोमातेची होणारी तस्करी आणि वाहनांमध्ये कोंबून केली जाणारी वाहतूक या सर्व  बाबींपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने महत्वाचा पुढाकार घेतला आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना करण्यात येत आहे. रविवारी २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मोहगाव झिल्पी येथे माजी खासदार श्री. अजयजी संचेती यांच्या हस्ते गोरक्षण धामचे भूमिपूजन होणार आहे.

आज गोमातेची होणारी तस्करी, वाहनांमध्ये कोंबून विविध ठिकाणी होणारी वाहतूक ही माणूस म्हणून प्रत्येकासाठी आव्हानाची बाब आहे. हिंदू धर्म संस्कृतीत गायीला आईचा दर्जा आहे. आपल्या आईच्या संरक्षणात आपण समर्थनीय ठरणे ही लाजीरवाणी बाब आहे. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सात-आठ इंडिका वाहनात पाच ते सहा गायींचे वासरू पकडण्यात आले. अशा अनेक घटना आजुबाजूला घडत असतात. स्वतः ला हिंदू म्हणवून घेणारे आपण गोमातेला आपल्या आईला वाचविण्यात असमर्थ ठरणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. सरकारने, पोलीस यंत्रणेने काम करावे आणि आपण फक्त बाता मारायच्या ही मानसिकता सोडण्याची गरज आहे.

हिंदू म्हणून, माणूस म्हणून आपल्या गोमतेला वाचवणे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना केली जात आहे. या कार्यात सर्व गोरक्षक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी महापौर तथा श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

रविवारला होणाऱ्या गोरक्षण धाम भूमिपूजन कार्यक्रमात सर्व नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. संदीप जोशी यांच्यासह श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धाम संचालन समितीचे उपाध्यक्ष श्री. गुरदीपसिंग कपूर, सचिव श्री. योगेश पालीवाल, कोषाध्यक्ष श्री. अनिरुद्ध भगत, सदस्य श्री. आशिष विजयवर्गीय, सदस्य श्री. योगेश जोशी यांनी केले आहे.