विचारवंत प्रा. जवाहर चरडे यांचं निधन 

0
मुळचे नरखेडचे प्राध्यापक जवाहर चरडे(Jawahar Charde) यांच १ जून पहाटे दुखद निधन झाले त्यांचे वय 80 वर्षाचे होते. सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. श्री रंजीत बाबू देशमुख यांच्या शिक्षण व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी होते. विचारवंत, मार्गदर्शक, समीक्षक, वक्ता, म्हणून स्पष्टपणे सल्ला देणारे समाजाचे हितचिंतक होते. समाजाच्या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मृदाभाषी सभावाचे सर्वांना मदत करणारे असे ते व्यक्तीमत्व होते. ते जाण्याने समाजाची हानी झालेली आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते घरी मेहर सोसायटी हिल टॉप नागपूर येथून आज शनिवार ला १ जून दू. १२ वा. निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी सूननातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.