

नागपूर (Nagpur)
हिवाळा ऋतू सुरू झाल्यानंतर काही जणांना आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात या समस्या टाळण्यासाठी आतापासूनच आरोग्याची योग्य ती देखभाल करण्यास सुरुवात करा. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे, यासाठी जाणून घेऊया काही सोप्या टिप्स.
1: पाणी प्या: पुरेसे पाणी पिणे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
2:त्वचेची काळजी:नियमितपणे मॉइश्चराइजर लावत रहा: दिवसातून दोनदा मॉइश्चराइजर लावणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चराइजर निवडा.
3:हेल्दी डाइट:पोषक तत्वांनी भरपूर आहार घ्या: फळे, भाज्या, हर्बल टी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा.
4पर्याप्त झोप घ्या: पुरेसा झोप घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
5:उबदार कपडे: उबदार कपडे घाला
शाल ,टोपी आणि ग्लोव्ज वापरा
6 व्यायाम : व्यायाम नियमित व्यायाम करा ,योग आणि प्राणायाम करा