

भंडारा(Bhandara), ०६ जुलै, :- तुमचे पैसे पडले आहेत अशी बतावणी करत दुचाकी थांबवायला भाग पाडत दुचाकीच्या डिक्कीतून पैश्याची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरातील स्टेट बँक समोर घडली. या पिशवीमध्ये बॅंकेतून काढलेले 40 हजार रुपये होते. ते घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात राहुल वासनिक रा. सोनी यांनी तक्रार दिली असुन पोलिस तपास करीत आहेत.