

जनतेशी थेट संवाद साधा आणि केलेल्या विकास कामांची माहिती द्या
वाशीम (Washim) ५ ऑगस्ट:- माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांनी भाजपा वाशीम जिल्हा कार्यकारिणी बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी पूर्वी झालेल्या चुका टाळण्याचे महत्त्व स्पष्ट करत, जनतेशी थेट संवाद साधण्याची आणि केलेल्या विकास कामांची माहिती देण्याची गरज अधोरेखित केली.
विजयराव जाधव (Adv. Vijayrao Jadhav) यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, संभ्रम टाळून मतदारसंघात जनतेशी संवाद साधणे आणि विकास कामांची माहिती पोहचवणे आगामी निवडणुकीत यशाचे गमक ठरेल. त्यांनी जनतेशी संवाद साधण्याचे महत्त्व पटवून दिले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी समाज माध्यमांवरून विरोधी पक्षांच्या अपप्रचाराचे खंडन करण्याची आणि जनतेला सत्य सांगण्याची सूचना केली. त्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे महत्त्व देखील पटवून दिले.
मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात मा. खासदार अनुप जी धोत्रे, रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस, मा. आ. लखन जी मलिक आहेत .