महामेट्रोच्या वाहतुकीवर चर्चा तर होणारच

0

*जन आक्रोश-महा मेट्रो नागपूरचा संयुक्त उपक्रम*

नागपूर (Nagpur):- दुचाकी-चारचाकी वाहनांचा उपयोग न करता पर्यावरणपूरक मेट्रो रेलचा वापर करावा असे आवाहन जन आक्रोश स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काल मेट्रो भवन येथे केला. महा मेट्रो आणि जन आक्रोश यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित `नागपूर मेट्रो : एक परिपूर्ण वाहतूक प्रणाली’ या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. वाहतूक नियमांचे पालन करून नागपूरकरांनी सुरक्षित प्रवास करावा या करता जन आक्रोश गेल्या अनेक वर्षांपासून जनजागृती करीत आहे.