

संगमनेर SANGMER -मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत. ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. कोणत्या कायद्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देणार? असा सवाल देखील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता असून त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले की, आश्वासनांच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याने भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये. विनाकारण मराठ्यांना नडू नका, अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाजन यांनी चुकीचे वक्तव्ये करू नये, असेही ते म्हणाले.